Our Story
ABOUT US २०२० मध्ये कोव्हिड सारख्या कठीण काळात फाउंडेशन अनेक कुटुंबाना आधार देण्याचे काम करीत होते. परंतु समाजात मानसिक आरोग्याबद्दल अजिबात माहिती नाही. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत अनेक व्यक्ती काळजी, भीती, ताण-तणाव, त्रासात, दुखात, नकारात्मक मानसिकतेत जीवन जगत आहेत हे लक्षात आले. त्यामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे ठरवले. फाउंडेशन मानसिक आरोग्य क्षेत्रात विविध कौन्सलिंगची उत्तम सेवा देण्याकरिता कौन्सलरच्या कौशल्याना आणि क्षमताना विकसित करण्याकरिता विविध कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. सोबतच समाजामध्ये मानसिक आरोग्याची जाणीवजागृती निर्माण करण्याकरिता, कौन्सलिंग सेवा पुरविण्याकरीता नवीन कौन्सलर, समन्वयक, ट्रेनर, कोच निर्माण करीत आहे. कौन्सलरला आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होऊन कौन्सलरला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याकरिता विविध प्रोजेक्ट आणि वर्कशॉप याचे आयोजन फाउंडेशन करते. (उदा:- बेसिक & ऍडव्हान्स कौन्सलिंग वर्कशॉप, parents & STUDENTS COUNSELLING workshop रिलेशनशिप कौन्सलिंग, करियर कौन्सलिंग वर्कशॉप, रिपोर्टबेस कौन्सलिंग, DMIT, NLP कौन्सलर, सायको थेरपिस्ट, स्पेशल चाईल्ड थेरपिस्ट.) सोबत नकारात्मक मानसिकतेत अडकलेल्या, मानसिक ताण-तणावात जीवन जगत असलेल्या सेल्फ कौन्सलिंग किंवा सेल्फ हिलिंग करता येईल यासाठी सुद्धा कार्यशाळा घेण्यात येतात. यामुळे समाजातील विविध घटकांना मानसिक आरोग्याच्या विविध सेवा पुरविण्याचे कार्य आपले फाउंडेशन करते. अशा पद्धतीने फाउंडेशनने अशोक सरांच्या मार्गदर्शनाखाली 3000+ कौन्सलर आणि 40000 पेक्षा जास्त व्यक्तींना कौन्सलिंगचा लाभ दिलेला आहे.
Meet Our Lead Mentor
मा. अशोक सोनवणे
संस्थापक अध्यक्ष -कौन्सलर, सायकोलॉजीस्ट, ब्रेन एक्स्पर्ट
Number Speaks
3k+
Counsellors
11K+
Workshops
12K+
Clients
9.5K+
Students