All Courses

माझ्या भूतकाळात अनेक नकारात्मक घटना घडल्या, त्या येथे सांगणे शक्य नाही. मी सावरायचा खूप प्रयत्न केला. परंतु प्रतिकूल परिस्थितीत आपल्याच जवळच्या व्यक्ती आपले शत्रू बनतात. स्वार्थी भावनेने आपल्यावर सतत ओरखडे ओरखडत राहतात. त्यामुळे तर मी अधिकच खचून गेले होते. मला डिप्रेशन केव्हा आले हे समजले देखील नाही. मला Psychiatrist ची मेडिसिन आणि तेथीलच कौन्सलरच्या कौन्सलिंग सुरु होत्या. परंतु मला विशेष आराम भेटत नव्हता. वजन अफाट वाढले होते. निराशा आणि उदाशी जातच नव्हती. सर्व काही संपल्याची भावना तयार होत होती. जिवंत प्रेत म्हणून जीवन जगत होते. परंतु माझ्यात आशावाद निर्माण करून जगायला शिकवणारा देवदूत म्हणजे अशोक सर आहेत. त्यांनी दिलेला भावनिक आधार, उपचारावर दररोजचा हक्काने असणारा व्हिडीओ कॉल यामुळे मी काहीतरी करीत होते. करता करता हा माणूस मला कधी स्वनात घेऊन गेला हे कळालेच नाही. हीच साथ मला अजूनही आहे. तुमच्यामुळेच मी आज उभी आहे.
सीमा
दादर मुंबई
मानसिक आजार काय असतात हे मला माहितीच नव्हते, त्यामुळे त्यावर उपचार घेणे शक्यच नव्हते. मेंदूमध्ये गोंधळ निर्माण होत होता, शंका जास्त निर्माण होयाच्या. मला माझेच बरोबर वाटत होते. त्यामुळे नात्यात आणि ऑफिसमध्ये खूपच विसंवाद झाले होते. मी एकटी पडून मला कुटुंबात आणि ऑफिसमध्ये सुद्धा बाजूला केले होते. केसगळती, पोटाचे आजार, मायग्रेन, बॉडीपेन, अनिद्रा, ऍसिडीटी, हार्मोनल समस्या असे अनेक शारीरिक त्रास माझ्या मानसिकतेमुळे झाले होते हे अशोक सरांना भेटल्यावर माहिती पडले. कितीही उपचार घेतले तरी हे शारीरिक त्रास काही कमी होतच नव्हते. परंतु अशोक सरांच्या कौन्सलिंगमुळे मानसिक आजाराचे परिणाम म्हणून शारीरिक आजार होतात हे मला माहिती झाले. मी माझ्या मानसिकतेवर आणि सरांच्या विविध थेरपीवर काम केल्याने आज मी शारीरिक आणि मानसिकदृष्टया समृद्ध आहे. मी पुन्हा माझ्या कुटुंबात आणि ऑफिसमध्ये माझे असतीत्व निर्माण केले आहे. धन्यवाद अशोक सर.
प्रणिता
वारजे, पुणे
मी Ma सायकोलॉजी तर केले परंतु जॉब मात्र १४,००० वर भेटला, पत्नी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये १०,००० वर जॉबला जात होती. परंतु महिन्याच्या शेवटी मात्र पैशाच्या समस्येवरून आमच्या पती-पत्नीमध्ये भांडण नेहमीचेच झाले होते. आर्थिक समस्या आणि आमच्यातील विसंवाद यामुळे आम्ही शरीराने सोबत होतो, परंतु भावनिकदृष्टया मात्र हळूहळू दूर जात होतो. याचा परिणाम आमचे नाते तुटण्यापर्यंत झालेला होता. त्यामुळे समस्या संपण्याच्या ऐवेजी वाढतच चालल्या होत्या. परंतु fb वर अशोक सरांचा नंबर भेटला, अशोक सरांच्या काही कार्यशाळा केल्या आणिसरांच्या मार्गदर्शनाखाली आता जॉब तर करीतच आहे. परंतु जॉबपेक्षा दुप्पट अशोक सर सोबत काम करून कमवत आहे. त्यामुळे माझा संसार आणि नाते सुद्धा सुखाने उभा झालेला आहे. धन्यवाद अशोक सर ...
सुरज - तुमचा विद्यार्थी कौन्सलर
पुणे
माझे हात-पाय थरथर कापायचे, हार्टबीट वाढायचे, श्वास जड होयचा, मला काहीतरी होईल का या विचाराने मी सतत अस्वस्थ मानसिकतेत जीवन जगत होतो. यामुळे पोटात गोळा आल्यासारखे वाटायचे त्यामुळे सतत ऑशरूमला जात होतो. पायाला गोळे येयचे आणि अनामिक थकवा आणि त्यातून भीती वाटायची. सतत चार वर्षे उपचार केले, सर्व टेस्ट केल्या परंतु सर्व रिपोर्ट मात्र नॉर्मल असायचे. अशा वातावरणामुळे माझे धाडस, आत्मविश्वास आणि कर्तुत्व हरवून गेलो होतो. जीवन जगण्याच्या आशाच संपल्या होत्या. परंतु हे सर्व नकारात्मक मानसिकतेत अडकून गेल्याने होते हे मात्र अशोक सरांना भेटल्यावर माहिती झाले. प्रथम तर माझा विश्वास बसलाच नव्हता. परंतु पहिल्याच सेशन नंतर झोप छान आली, फ्रेश वाटत होते, एक वेगळाच रिझल्ट खूप वर्षानंतर अनुभवत होतो. त्यामुळे अशोक सरांच्या थेरपीमध्ये दम आहे हे माझ्या लक्षात आले. पुढे फक्त तीनच सेशन सरांचे घेतले. कारण सरांनी पुढे सेशन घेण्याचे बंद केले, तुम्ही माझ्या कुबड्यावर चालायचे नाही, स्वतः धडपड करायची ही ऑर्डरच केली होती. मग मी सरांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या मानसिकतेवर काम केले आज मी माझ्या जीवनाचा भरपूर आनंद घेत आहे.
प्रवीण
अमरावती